ज्या मानसिकतेमुळे प्रश्न निर्माण झालेत, त्याच मानसिकतेच्या मदतीने ते सोडवता येणे शक्य नाही.
प्रश्न सोडवायचा आहे की नाही यावर एकमत झाले की, पुढचा टप्पा येतो मानसिकता बदलण्याचा. शिक्षण हे खरे तर कोणत्याही प्रश्नावरचा उपाय असणं अपेक्षित असताना आज शिक्षण हाच एक प्रश्न होऊन बसलेला आपल्याला दिसतोय. प्राथमिक उपचार म्हणून सध्या जे काही चालू आहे, ते ठीक असले तरी पुढच्या काळासाठी ते पुरेसे नक्कीच नाही. त्यात भर म्हणजे आधीच्या ‘शाळा आहे पण शिक्षण नाही’ या परिस्थितीतून आपण आता ‘शाळाही नाही!’ या वळणावर आलो आहोत.......